Subscribe Us

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 | State Level Innovation Competition Year 2022-23

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 | State Level Innovation Competition Year 2022-23


दिनांक : 31 ऑक्टोबर 2022
विषय : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 च्या आयोजनाबाबत..!!


    राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनाना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक याच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

1. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका
2. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
3. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
4. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपाल गट
5. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केदप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

    तसेच ही स्पर्धा पहिल्या टप्प्यात गट १ व ३ यासाठी जिल्हा / DIET व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील, शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats App, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमाच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, DIET व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, यानी एकमेकांशी समन्वय साधावा.

    आपल्या स्तरावरून देखील सोबत दिलेल्या माहितीपत्रकाचे वाचन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी आपल्या कार्यालयातील सर्व अधिका-यांना याबाबत अवगत करावे. या स्पर्धेची जबाबदारी एका सक्षम अधिका-याकडे देण्यात येऊन नवोपक्रम स्पर्धेची माहिती पोहचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास researchdept@maa.ac.in या ई-मेल द्वारे कळविण्यात यावा.

    त्यानुसार आपल्या अधिनस्त अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी संयिका व पर्यवेक्षिका याना https://scertmaha.ac.in/innovation/ या लिंकवर दि.०२/११/२०२२ ते दि.२०/११/२०२२ या कालावधीत आपले नवोपक्रम अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे.

अत्यंत महत्वाची सूचना -

नवोपक्रम लिंक भरण्यापूर्वी आपण पुढील तयारी केली आहे काय ?

१. नवोपक्रम अहवालाची pdf फाईल
२. नवोपक्रम अहवालाची Word फाईल
३. प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र Pdf फाईल
४. स्पर्धकांचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
५. आवश्यकतेनुसार आपल्या व्हिडिओची Youtube लिंक

हे पूर्णतः तयार करूनच आपण लिंक भरायला सुरुवात करावी.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 संपूर्ण माहिती -

1) राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे -

2) नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे -

3) स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी -

4) स्पर्धेचे नियम - 


5) नवोपक्रम अहवालाचे मुल्यांकन -

6) राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही -

7) नवोपक्रम बँक -


Post a Comment

0 Comments