Subscribe Us

शिष्यवृत्ती परीक्षा जुलै-2022 (इयत्ता 5वी व 8वी) अंतिम निकाल

शिष्यवृत्ती परीक्षा जुलै-2022 (इयत्ता 5वी व 8वी) अंतिम निकाल 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी चा अंतिम निकाल सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.

शाळांनीआपल्या विद्यार्थ्यांचा निकाल व पालकांनी आपल्या पाल्यांचा निकाल खालील CLICK HERE बटणाच्या माध्यमातून थेट संकेतस्थळावर जाऊन पाहावा..!!

(विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी परीक्षा / सीट क्रमांक टाकावा.)

(शाळा निकाल पाहण्यासाठी शाळेचा U-Dise क्रमांक वPassword टाकावा.)

गुण पडताळणी व दुरुस्ती -

1) विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिन मध्ये 7 नोव्हेंबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

2) गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपर करीता रुपये 50 याप्रमाणे शुल्काचे रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक्य आहे. 

3) विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी ग्रामीण अभ्यासक्रम इत्यादी मध्ये दुरुस्तीसाठी दिनांक 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत संबंधी शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 

पडताळणी नियम -

- सदर ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त आणि कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाही. 
- विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
- विहित मुदतीची आवश्यकता शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जा, नुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसापर्यंत कळवण्यात येईल.
- विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

Post a Comment

0 Comments