Subscribe Us

मतदान ओळखपत्र व आधार कार्ड लिंक कसे करावे?

मतदान ओळखपत्र व आधार कार्ड लिंक कसे करावे?



मतदान / निवडणूक कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे आता अनिवार्य झाले आहे. म्हणून आधार आणि मतदार कार्ड लिंक कसे करावे? याबाबत आपण माहिती बघू या..!!

पद्धत क्रमांक 1

सर्वप्रथम खालील लिंकला स्पर्श करा.
|
|
Create an account वर क्लिक करा
|
तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करा.
|
आलेला OTP तिथे ढाका व Verify वर क्लिक करा.
|
पासवर्ड आणि Capcha टाकून लॉग इन करा.

पुढे तुमच्याकडे नाव, आडनाव, Male/Female टाका उजवीकडील तिन टिंबावर क्लीक करून प्रोफाइल वर क्लिक करा तिथे Voter ID टाकून सबमिट करा. 

त्यांनतर समोर आलेल्या डेटाबेसमध्ये तुमची माहिती दिसेल. ही माहिती समोर आल्यानंतर डावीकडे दिलेल्या Feed Aadhaar No च्या ऑप्शनवर क्लिक करा. एक पेज समोर येईल. 

तिथे आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, व्होटर आयडी रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकावा लागेल. सर्वकाही भरल्यानंतर Submit या बटनवर क्लिक करा. त्यानंत्तर तुमचा अर्ज रजिस्टर्ड झाल्याचा Msg येईल.

पद्धत क्रमांक 2

Voter Helpline हे app डाऊनलोड करा
|
|
Voter Registration ला क्लिक करा.
|
फॉर्म 6 b ला क्लिक करा.
|
Lets start ला क्लिक करा.
|
आपला मोबाईल नंबर टाका.
|
आपल्याला OTP येईल तो टाका.
|
OTP टाकल्यानंतर verify ला क्लिक करा.
|
Voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा.
|
Voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा.
|
नंतर proceed वर क्लिक करा.
|
आता तुमचा आधार नंबर टाका.
|
Done करा व  confirm ला क्लिक करा.

तुम्हाला आधार व निवडणूक ओळखपत्र जोडल्याचा संदेश प्राप्त होईल.

Post a Comment

0 Comments