Subscribe Us

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2022-23 | शाळा Institute प्रोफाईल Update कशी करावी?

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2022-23 | शाळा Institute प्रोफाईल Update कशी करावी?


शाळेची प्रोफाईल Update कशी करावी?
सन 2022- 23 करिता अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीचे Fresh व Renewal अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. Renewal अर्ज भरावयाच्या विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी सर्वप्रथम आपल्या शाळेतील Renewal विद्यार्थ्यांची यादी काढून त्या विद्यार्थ्यांचे Renewal फॉर्म भरावेत व या यादी व्यतिरिक्त आपल्या शाळेत शिक्षण घेत असलेले अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व या शिष्यवृत्तीचे अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Fresh अर्ज भरावेत.


Fresh आणि Renewal विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम नोडल ऑफिसर (मुख्याध्यापक) यांनी शाळा लॉगिन करून शाळेची प्रोफाईल अपडेट करून घ्यावी. शाळेची प्रोफाईल अपडेट केल्याशिवाय NSP पोर्टल वरील कोणत्याही विद्यार्थ्यांचा अर्ज पडताळणी करता येणार नाही. गेल्यावर्षी प्रोफाईल अपडेट केली असेल तरीसुद्धा या वर्षी पुन्हा करावी. विलंबास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.


शाळा / InstituteLogin कसे करावे?
1) शाळेचे प्रोफाईल Update करण्यासाठी सर्वप्रथम वरील NSP Portal Open करून घ्यावे.
2) त्यानंतर Institute Coner मधील Institute Login या Page ला Open करावे.
3) नवीन Page Open झाल्यानंतर लॉगिन Type Institute Nodal  Officer पर्याय निवडावा.
4) त्यानंतर (Academic Year) शैक्षणिक वर्ष 2021-22 हा पर्याय निवडावा.
5) त्याखालील Box मध्ये Login ID व पासवर्ड टाकावा.
6) शेवटी Captcha Code टाकून लॉगीन या बटनावर क्लिक करावे.

शाळा Login  होत नसल्यास काय करावे?
1) खालील School/Institute Forgot Passward या बटनावर Click करावे.
2) शाळा UDise क्रमांक व Institute Nodal  Officer हा पर्याय निवडावा.
3) Captcha क्रमांक टाकून Submit या बटनावर Click करावे. 
4) 5 Digit OTP HM च्या Registered Mobile क्रमांकावर Sent होईल.
5) मिळालेला OTP टाकून Confirm Otp या बटनावर Click करावे.
6) New Passward हा पर्याय दिसेल आपण नवीन Passward तयार करावा.

Institute Profile Update Form -
1) शाळा Login झाल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला Administration हि Tab दिसेल.
2) त्यावर Click केल्यानंतर आणखी काही पर्याय Open होतील.
3) त्यापैकी Update Profile या पर्यायावर आपण Click करावे.
4) Click करताच एक OTP Nodal  Officer ला जाईल तो टाकावा.
5) OTP टाकताच शाळेची Profile आपल्या समोर Open होईल.
6)त्यामध्ये Institute Profile Update Form दिसेल तो खालीलप्रमाणे भरावा.

Institute Details -
(यामध्ये शाळेविषयी माहिती भरावयाची आहे)
Institute Nature - शाळेचा प्रकार निवडा.
Board State - राज्य निवडावे.
Board/University Name - बोर्ड निवडावे.
Institute Address - शाळेचा पत्ता टाकावा.
Registered Certificate- प्रमाणपत्र Upload करावे.
(Nodal  Officer चे आधार कार्ड आपण Upload करू शकता.)

Contact Person Details -
यामध्ये शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती आधार कार्ड वरून अचूक भरावी. नोडल ऑफिसर हे शाळेचे मुखाध्यापक किंवा मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे कर्मचारी असावेत. (आधार नंबर, आधार कार्ड वरील नाव, जन्म तारीख, लिंग, मोबाईल नंबर, Email , पद ई.) नोडल ऑफिसर यांची माहिती आधार वरील माहितीशी मॅच झाल्या नंतर otp येईल त्यानंतरच तुम्ही प्रोफाईल Update करू शकाल त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा.

Head of institute Details -
(यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापक यांची माहिती भरा.)
मुख्याध्यपक यांचे आधार कार्ड वरील नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पद इत्यादी.

Bank Details -
(यामध्ये शाळेच्या बँकेची माहिती भरावी.)
IFSC Code व Bank Account No हि माहिती अचूक भरावी.
शेवटी final submit या बटणावर क्लिक करावे.


अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे कोणती?
1. आधार कार्ड चे झेरॉक्स.
2. बँक पासबुकची झेरॉक्स.
3. मोबाईल सोबत असावा.
4. बोनाफाईड (बोनाफाईडवर दाखल खारीज क्रमांक व हजेरीचा रोल क्रमांक असणे आवश्यक आहे.)
5. गुणपत्रिका (मागील शैक्षणिक वर्षाची)
6. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदाराचा)

Post a Comment

0 Comments