Subscribe Us

विदयाप्रवेश (शाळापूर्व तयारी कार्यक्रम-इयत्ता पहिली) शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी कृतिपुस्तिका

विदयाप्रवेश (शाळापूर्व तयारी कार्यक्रम-इयत्ता पहिली) शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी कृतिपुस्तिका


विद्याप्रवेश कार्यक्रम कालावधी :-
महाराष्ट्र :- २० जुन ते १० सप्टेंबर २०२२
विदर्भ :- ०४ जुलै ते २४ सप्टेंबर २०२२


🔸 कार्यक्रम अंमलबजावणी मार्गदर्शक पत्र पहा.- CLICK HERE

🔸 शाळापूर्व तयारी कार्यक्रम उद्बोधन सत्र बघा.- CLICK HERE

निपुण भारत अभियान (विद्याप्रवेश) -
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशातील सर्वच बालकांनी २०२६-२७ पर्यंत प्राथमिक स्तरावर पायाभूत साक्षरता व संख्यात्मक कौशल्ये प्राप्त करणे हे शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्तीसाठी “NIPUN BHARAT” हे अभियान सुरु करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत इयत्ता १ ली मध्ये प्रवेशित सर्व बालकांसाठी शैक्षणिक वर्षतील पहिले १२ आठवडे म्हणजेच ३ महिने बालकांच्या शाळा पूर्व तयारीसाठी “विद्याप्रवेश” हा कार्यक्रम घेणे निश्चित करण्यात आलेले आहे.

पूर्व प्राथमिक शिक्षण घेऊन इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणारे बालक औपचारिक शिक्षण प्रक्रियेतील या महत्वाच्या टप्प्यावर आता नवनवीन विषय शिकणारे व नवीन कौशल्ये प्राप्त करणारे असते. औपचारिक शिक्षण घेण्यापूर्वी बालकाची काही बाबतीत पूर्वतयारी होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने औपचारिक शिक्षण प्रक्रियेतील वाचन, लेखन व गणित शिकण्याची त्याची पूर्व तयारी होणे गरजेचे असते. सर्वसाधारण हि पूर्वतयारी अंगणवाडी किंवा बालवाडीमध्ये करून घेतली जात. पण पहिलीमध्ये येणारी काही बालके हि बालवाड्यामधून येतात तर काही बालके असा कोणताच अनुभव न घेता येतात. त्यामुळे प्रत्येक बालकाची पूर्व तयारी वेगवेगळ्या पातळीवर असू शकते. अशा वेळी सर्व बालकांची शाळा पूर्व तयारी करून घेणे हि बालकांच्या पुढील शिक्षणासाठीचा पाया म्हणून खूप महत्वाची असते.

शिक्षक मार्गदर्शिका -
शाळा पूर्व तयारी अंतर्गत शिक्षण मार्गदर्शिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडून तयार करण्यात आलेली आहे. यात बालकांची शाळा पूर्व तयारी व्हावी यासाठी कृतिपुस्तिकेचा वापर कसा करावा? याबाबत देण्यात आलेली आहे. 

शिक्षक मार्गदर्शिका डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला स्पर्श करा.
विद्यार्थी कृतिपुस्तिका -
एकूण ४६ कृतीपत्रिका मुलांकडून सोडवून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी कृतीपत्रिका सोडविण्यासाठी शिक्षक व पालक त्यांना मदत करू शकतात. या कृतीपत्रिका आनंददायी असल्याने बालकाला शाळेत नियमित येण्यासाठी व शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

विद्यार्थी कृतिपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला स्पर्श करा.
विद्याप्रवेश कार्यक्रमाची उद्दिष्टे :-
१) भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या, इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र सर्व मुलांना शाळा प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे.
२) मुलांचा इयत्ता पहिलीमधील प्रवेश सहज व आनंददायी करणे.
३) मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी आणि उत्साही वातावरणात वयानुरूप व खेळ-आधारित शैक्षणिक अनुभव देणे.
४) भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या सर्व मुलांना त्यांच्या वयानुरूप आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रारंभिक शिक्षण अनुभव प्रदान करणे.
५) मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर लक्ष केंद्रित करणे, याकरिता शिक्षकांची अध्यापन शास्त्रीय पायाभरणी मजबूत करणे.
६) खेळ-आधारित अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनातून मुलांचे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यात अभिप्रेत असलेल्या क्षमता विकसित करणे.

Post a Comment

0 Comments