Subscribe Us

NMMS Exam सराव प्रश्नपत्रिका | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा

NMMS Exam सराव प्रश्नपत्रिका | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा | NMMS Exam Practice Question Paper


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)
सन : २०२१-२२ इयत्ता : ८वी साठी

परीक्षा दिनांक :- १९ जून २०२२ (रविवार)

NMMS Exam 2021-2022 
NMMS Exam ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी होण्याऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000 एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे 8वी ते 12वी पर्यंत एकूण 48,000 रु मिळते. 12 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा निश्चितच फायदा होणार आहे.

NMMS Exam 2022 शासन परिपत्रक डाउनलोड करा - Click Here
NMMS Exam 2022 Online आवेदनपत्र भरा - Click Here

NMMS Exam परीक्षा स्वरूप -
NMMS परीक्षेसाठी एकूण दोन पेपर असतात.
1) SAT - शालेय क्षमता चाचणी
2) MAT - मानसिक क्षमता चाचणी

NMMS Exam सराव प्रश्नपत्रिका संच -
सन- 2015 ते 2021 पर्यंतचे SAT आणि MAT अशा दोनही स्वरूपाचे NMMS Exam Practice Question Paper माध्यम - मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू व ईतर सर्व विषयासह उपलब्ध करून देण्यात आहे. वर्षनिहाय सराव प्रश्नपत्रिका Download करण्यासाठी पुढील Click Here या बटनाला स्पर्श करा..!!

२०२०-२१ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) - Click Here

२०१९-२० प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) - Click Here

२०१८-१९ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) - Click Here

२०१५-१८ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) - Click Here


अधिसूचना (परीक्षा प्राधान्य)
दि. 05/04/2022

विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१-२२ इ.८ वी साठी परीक्षा रविवार दिनांक १९ जून २०२२ अधिसूचना

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक ०६ एप्रिल २०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

उपरोक्त परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा विचार करून शाळांनी खालील बाबी विचारात घ्याव्यात.

१. सदर परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्रे शाळेमार्फतच भरावयाची आहेत.

२. विद्याथ्र्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती. मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती व आवश्यक परीक्षा शुल्क संकलन करणे.

३. शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- प्रतिसंस्था, प्रति शैक्षणिक वर्ष तसेच परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु. १००/- रक्कमेचा भरणा सदर परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ई-चेकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

(शैलजा दराडे)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-१

Post a Comment

0 Comments