Subscribe Us

इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती अर्ज कसा भरावा? (द्वितीय मुदतवाढ दि. 02/05/2022)

इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती अर्ज कसा भरावा? (द्वितीय मुदतवाढ दि. 02/05/2022)

महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
१७. डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ०१

प्रति,
मा. महासंचालक,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
तळमजला, मंत्रालय, मुंबई ४०००३२.

विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) २०२२ ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता व्दितीय मुदतवाढ देणेबाबत..!!

महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ ची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर परीक्षा दि. २०/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे प्रस्तावित असून त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी दि. २३/०४/२०२२ ते दि. ३०/०४/२०२२ या कालावधीत तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणेसाठी दि. ०२/०५/२०२२ रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर मुदतवाढीच्या प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.

शिष्यवृत्ती अर्ज कसा भरावा?

Website: www.mscepune.in
Email: mscescholarship@gmail.com
दूरध्वनी क्र. ०२०-२६१२३०६६/६७

आपली विश्वासू,
(शैलजा दराडे) आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे ०१.

Post a Comment

0 Comments