Subscribe Us

शिक्षक बदली प्रक्रिया-2022 | VC 05.04.2022 मधील नवीन अपडेट

शिक्षक बदली प्रक्रिया-2022 | VC 05.04.2022 मधील नवीन अपडेट


जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याच्या अनुषंगाने शिक्षक बदल्याबाबतच्या अभ्यासगटातील सर्व सदस्य विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रा.वि.वि.) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5.4.2022 रोजी (VC) बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत झालेल्या चर्चेनुसार शिक्षक बदली सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक ते बदल करणे संदर्भात संचालक विन्सीस सॉफ्टवेअर कंपनी लि. यांना आदेश देण्यात आले आहेत. 

बदली सॉफ्टवेअर संबंधित परिपत्रक डाउनलोड करा.


बदली सॉफ्टवेअर मध्ये कोणते बदल केले जाणार?

1) निलंबनातून सेवेत पुनः स्थापित केल्यानंतर संबंधित शिक्षक ज्या शाळेत ज्या दिनांकापासून रुजु होतात तो दिनांक बदलीकरिता ग्राह्य धरण्यात यावा. तसेच बदलीकरिता पदावधीची गणना करताना दीर्घ काळ गैरहजरीचा कालावधी वगळण्यात यावा. निलंबनाधीन असलेला व अनधिकृतपणे गैरहजर / फरार असलेला शिक्षक अनुक्रमे पुनः स्थापित किंवा कामावर हजर होत नाही, तोपर्यंत त्याचा बदलीसाठी विचार करण्यात येऊ नये.

2) संबंधीत शिक्षक जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर प्रत्यक्ष शाळेत रुजू झाल्याच्या दिनांकाच्या आधारे पदावधीची परिगणना करणे आवश्यक आहे.

3) अनुक्रमांक १ येथील स्पष्टीकरणाचे अवलोकन करावे.

4) प्राथमिक शिक्षकास तात्पुरत्या स्वरुपात अन्य ठिकाणी पदस्थापना दिली असली तरी त्यांचा जिल्ह्यात रुजु झाल्याचा दिनांक हा पदावधीची परिगणना करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा.

5) त्यांच्या नियुक्ती संदर्भातील मुळ पदवी प्रवर्ग विचारात घेऊन त्यांचा समावेश संबंधीत बदली प्रवर्गात करण्यात यावा.

6) त्यांचा मुळ नियुक्ती प्रवर्ग विचारात घेणे आवश्यक आहे. परंतु अशा प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.

7) या बाबत संबंधित जिल्हा परिषदेकडून माहिती प्राप्त करून घेऊन त्या आधारे कार्यवाही करावी.

8) सन २०१९ पूर्वी सर्वसाधारण बदल्या होत होत्या. त्यामुळे सर्वसाधारणपणे विचार करण्यात यावा.

9) सर्वसाधारण द्विभाषिक शाळांच्या संदर्भात मराठी शाळा तर भाषिक अल्पसंख्याक शाळांच्या बाबतीत संबंधित भाषेच्या शाळा (उदा. ऊर्दु, कन्नड, गुजराती इत्यादी) असा प्रकार समजण्यात यावा.

10) सद्य:स्थितीत दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेले संवर्ग विचारात घेण्यात यावेत परंतु, अशी प्रकरणे असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शोधून काढावीत व त्यांच्या स्तरावरुन निर्णय घ्यावा.

बदली शासन निर्णय Download करा..!!



Post a Comment

0 Comments