शिक्षक बदली प्रक्रिया-2022 शालार्थ प्रणाली मार्फत राबविली जाणार आहे. तरी पोर्टल वरील माहिती (डाटा) अपडेट करण्यासंदर्भात खालील प्रमाणे योग्य कार्यवाही करण्यात यावी.
1. शिक्षक बदली साठी सर्व माहिती शालार्थ पोर्टल वरून घेतली जाणार आहे त्यासाठी सदर पोर्टल मधील शाळेची मुख्याध्यापकांची व शिक्षकांची माहिती Update करावी.
2. शिक्षकांचा आधार कार्ड ,पॅन कार्ड, मोबाईल नंबर, Email Id Update करावा.
3. शिक्षकांचे इंग्रजी मधील नावाचे स्पेलिंग बरोबर आहे किंवा नाही ते तपासून योग्य ती दुरुस्ती करावी.
4. Attach / Detach आज रोजी जे शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहेत त्यांचीच माहिती त्या शाळेच्या शालार्थ प्रणालीत यायला हवी. शालार्थ प्रणालीत या पूर्वीच एखादे शिक्षक त्या शाळेवरून बदलून गेले असतील तर त्यांची माहिती ते शिक्षक ज्या शाळेवरून बदली करून गेले त्या शाळेच्या शालार्थ प्रणालीतून (Detached)कमी करून ते ज्या शाळेवर हजर झालेले आहेत तेथे त्यांची माहिती (Attached )टाकायची आहे.
5. शालार्थ प्रणालीत शाळेचा Udise नंबर काळजीपूर्वक भरावा. शाळेची प्रोफाइल Update करावी.
6. शिक्षकांचा भ्रमणध्वनी नंबर शालार्थ प्रणालीत भरताना काळजीपूर्वक भरावा, कारण बदली साठी शिक्षकांना Sms पाठविला जाणार आहेत.
7. शालार्थ Updation कामकाज हे HM लॉगिन वरून करायचे आहे.
8. शालार्थ पोर्टल वरील शिक्षक माहिती विहित मुदतीतच Update करावी. त्यानंतर त्यात कोणताही बदल होणार नाही व शिक्षक बदल्यांसाठी चुकीची माहिती शालार्थ पोर्टल वरून गेल्यास त्यास संबंधित मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदार राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
0 Comments