Subscribe Us

शाळा व्यवस्थापन समिती स्थापना | पुनर्गठन पूर्वतयारी | प्रत्यक्ष कार्यवाही व शासन निर्णय | SMC

शाळा व्यवस्थापन समिती स्थापना | पुनर्गठन पूर्वतयारी | प्रत्यक्ष कार्यवाही व शासन निर्णय | SMC


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील भाग-चार, कलम २१ अनुसार प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये, शाळा व्यवस्थापन समिती (School Management Committee) स्थापन करणे अनिवार्य आहे. 

🟥शासन निर्णय🟥
1)SMC रचनेच्या अटी व शर्ती, 2)SMC समितीची कार्ये, जबाबदाऱ्या व  महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील Click Here बटनाला स्पर्श करून शासन निर्णय 17 जून 2010 Download करा..!!
🎯 SMC रचना, कार्ये व जबाबदाऱ्या सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील Click Here या बटनाला स्पर्श करा..!!
🟨टप्पा क्र.1 पूर्वतयारी🟨
🔴१. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन पूर्वतयारी करताना सद्यस्थितीत असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीस अवगत करावे.
🔴२. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना किमान आठ दिवस अगोदर पालक सभेचे लेखी सूचना द्यावी. ज्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन दिनांक, वेळ, स्थळ यांचा उल्लेख करावा. लेखी सूचना रजिस्टरवर पालकांच्या स्वाक्षर्‍या घ्याव्यात.
🔴३. त्याच दिवशी स्थानिक प्राधिकरण किंवा ग्रामपंचायतला पत्र देऊन एक सदस्याची मागणी करावी जेणेकरून पालक सभेपर्यंत त्यांचे नाव आपल्यापर्यंत येईल त्यामुळे समिती मधील महिला व पुरुषांचे प्रमाण राखणे शक्य होईल.
🔴४. RTE कलम २१ नुसार पुनर्गठन करतांना पुनर्गठन मधील बारकावे समजून घ्यावेत.
🔴५. सदर समितीमध्ये १२ ते १६ सदस्य संख्या राहील (मुख्याध्यापक पदसिद्ध सचिव-१ स्विकृत विद्यार्थी सदस्य-२ वगळून)
🔴६. एकूण समितीच्या ७५ % आई-वडील किंवा पालक सदस्य त्यांची निवड पालक सभेतून करावी.
🟡१. पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक वर्गातून सदस्य घ्यावेत.
🟡२. तसेच उपेक्षित गटातील, दुर्बल घटकातील व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या माता पित्यांना प्रमाणशीर सदस्यत्व देण्यात यावे. म्हणजे ज्या वर्गात इतर वर्गाच्या तुलनेत अधिक विद्यार्थी संख्या असेल अशा वर्गातून वरील गटातील पालकांना जास्तीचे पालक सदस्यत्व देण्याचा प्रयत्न करावा.
🟡३. कोणत्या वर्गातून किती सदस्य घ्यावे हे निश्चित करताना उदा. १ली ते ८वी मध्ये १२ पालक घेताना प्रत्येक वर्गाला मुलांच्या प्रमाणानुसार पालकांचे सदस्यत्व मिळेल हे निश्चित करावे लागते.

म्हणजे :- एकूण विद्यार्थी भागिले एकूण सदस्य संख्या
समजा वर्ग निहाय एकूण पटसंख्या १७८ आहे.
१७८ ÷ १२ = १४.८३ म्हणजे १५ मुलामागे एक सदस्य

वर्ग | पटसंख्या | अपेक्षित सदस्य संख्या
वर्ग १ला    २९    
वर्ग २रा    ३०    
वर्ग 3रा    ३२    
वर्ग ४था    २८    
वर्ग ५वा    १८    
वर्ग ६वा    १५    
वर्ग ७वा    १४    
वर्ग ८वा    १२    
एकूण
पटसंख्या | १७८ | १२ सदस्य


🟡४. याच बरोबर इतर घटकांना प्रतिनिधित्व देता येत नाही असाच नियम लावला पाहिजे कि, ज्या वर्गात एखाद्या घटकातील मुलांची संख्या जास्त आहे तेथे पुरुषांना सदस्य देणे. तसेच ज्या वर्गात मुलींची संख्या तुलनेने जास्त आहे तेथे महिला सदस्य द्यावेत.
🟡५. जातिनिहाय :- १)OPEN- ८०/१५ = ५ प्रतिनिधी, २)SC- २६/१५ =२, ३)OBC- ५२/१५ = ४ ,४) ST -१८/१५ =१ अश्या प्रमाणात निवड करावी. परंतु शाळेमध्ये अल्प प्रमाणात काही संवर्गातील विद्यार्थी असतील तर त्यांनाही प्रतिनिधित्व प्रमाणात देणे अपेक्षित आहे.

🔴७. २५ % इतर सदस्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक शिक्षण तज्ञ यांचा समावेश होतो.
🟡१. वेगवेगळ्या वर्गातून १ मुलगा १ मुलगी असे २ विद्यार्थी स्वीकृत सदस्य घ्यावेत विद्यार्थी सदस्य स्वीकृत सदस्य असल्यामुळे एकूण समितीमध्ये त्यांचा समावेश होत नाही. जर एकूण समिती १६ सदस्यांची असेल तर २ विद्यार्थी प्रतिनिधी मिळून १८ सदस्य संख्या व १ मुख्याध्यापक सचिव असे एकूण १९ सदस्यांची समिती होईल.
🟡२. सर्व शिक्षकांच्या मदतीने शिक्षक प्रतिनिधीची निवड करावी.
🟡३. ग्रामपंचायत कार्यालयाला अधिकृत पत्र देऊन एक सदस्याची मागणी करावी.
🟡४. पालक सभेमधूनच स्थानिक शिक्षण तज्ञ सदस्यांची निवड करावी.

🔴८. एकूण समितीच्या ५०% महिला सदस्य घेणे अनिवार्य आहे.
🟡१. फक्त पालक सद्स्यातून ५० % महिला घेतल्यास प्रमाण चुकते व RTE नुसार महिला प्रमाण होत नाही. त्याकरिता स्थानिक प्राधिकरण अथवा ग्रामपंचायत कडून महिला किंवा पुरुष सदस्य मिळाल्यास, पालकांमधून महिलांचे प्रमाण वाढविण्याबाबत निर्णय घेता येईल. उदा. जर ग्रामपंचायत सदस्य महिला असेल तर ५० % महिला प्रमाण राखताना अडचण येणार नाही. अन्यथा पुरुष सदस्य दिले तर पालक सद्स्यातून महिलांचे प्रमाण वाढवावे लागेल. त्याकरिता किमान आपल्या पालक सभेपर्यंत ग्रामपंचायत प्रतिनिधी मिळेल या बेताने पूर्वीच ग्रामपंचायतला पत्र लिहून सदस्यांची मागणी करावी.

🟨टप्पा क्र.2 प्रत्यक्ष कार्यवाही🟨
🔴१. वर्ग निहाय प्रतिनिधित्व संख्या व जात निहाय सदस्य संख्या यांची माहिती तयार करून पुनर्गठन करण्यापूर्वी फलकावर लावून घ्यावी.
🔴२. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन दरम्यान -
🟡१. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्याच्या दिवशी सर्व पालक वर्ग निहाय बसतील यासाठी व्यवस्था करावी.
🟡२. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यापूर्वी सर्व उपस्थित पालकांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे कर्तव्य, जबाबदारीची माहिती द्यावी.
🟡३. वर्ग निहाय किती सदस्य निवडणार आहोत हे फलकावर मांडून ठेवावे व त्यानुसार सूचना देऊन इच्छुक सदस्यांची नावे फळ्यावर अनुक्रमे लिहावीत.
🟡४. वर्ग निहाय सदस्य निवडताना गोंधळ होण्याची शक्यता असेल तर गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे. अन्यथा खुले मते देखील स्वीकारू शकतो.
🟡५. गुप्त मतदान घेताना शाळेच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून सर्व पालकांना वाटाव्यात व त्यावरती सदस्यांचे नाव किंवा अनुक्रमांक लिहून घ्यावा.
🟡६. एका वर्गातून एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार असेल तर एक एक सदस्यांची निवड प्रक्रिया राबवावी.
🟡७. जास्त मते मिळालेल्या सदस्यांना विजयी घोषित करावे.
🟡८. पूर्वतयारी मधील माहितीच्या आधारे सदस्यांची निवड करून घ्यावी.
🟡९. सर्व वर्गातील पालक सदस्यांची निवड झाल्यावर पालक सभेमधून एका स्थानिक शिक्षण तज्ञ सदस्यांची निवड करून घ्यावी. हा सदस्य पालक असणे अनिवार्य नाही.
🟡१०. स्थानिक शिक्षण तज्ञ सदस्य निवडल्यानंतर फक्त ७५% पालकांमधून नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घ्यावी. व त्यांच्या मधूनच समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करण्यास सांगावे या प्रक्रियेदरम्यान इतर पालकांचा हस्तक्षेप होत असेल तर एखाद्या वेगळ्या वर्गखोलीत व्यवस्था करून अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करून घ्यावी अथवा पुन्हा एक ते दोन दिवसांचा अवधी देऊन दिनांक वेळ स्थळ ठरवून पालकांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करून घ्यावी.
🟡११. त्यानंतर शिक्षकांमधून निवडलेल्या एका प्रतिनिधीचे नाव समितीमध्ये घ्यावे.
🟡१२. त्याचप्रमाणे बाल सभेमधून दोन निवडलेल्या स्विकृत विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश या समितीमध्ये करावा.

🟨टप्पा क्र.3 समिती पुनर्गठनानंतर🟨
🔴१. पालक सभेचे इतिवृत्त वर सर्व उपस्थित पालकांचे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केल्याबद्दल इतिवृत्त लिहून स्वाक्षऱ्या घ्याव्यात व निवडलेल्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांची नावे वाचून दाखवीत.
🔴२. इतरही महत्त्वाच्या सूचनांचे व नियमांचे वाचन करून नवनिर्वाचित समितीला व पालकांना अवगत करावे.
🔴३. सरतेशेवटी नियोजीत पालक सभा नवनिर्वाचित समिती चे स्वागत व आभार मानून बंद करावी.

Post a Comment

0 Comments