Subscribe Us

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? पोर्टलच्या मदतीने एका मिनिटात मिळवा माहिती?

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? पोर्टलच्या मदतीने एका मिनिटात मिळवा माहिती?


आधार कार्ड, पॅन कार्ड या ओळखपत्रांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतांना आपण पाहतो. तुमच्या ओळखपत्रांचा वापर चुकीच्या कामासाठी होत आहे का? किंवा तुमच्या नावावर किती सिम कार्ड वापरले जात आहेत? हे आपण आता सहज जाणून घेऊ शकतो.

ओळखपत्राबाबत कोणती माहिती मिळणार?
1) ओळखपत्रांचा चुकीच्या कामासाठी वापर होत आहे का?
2) तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टरआहेत?
3) ओळखपत्र वापरून आर्थिक फसवणूक होत आहे का?


ऑनलाइन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधून लोकांची फसवणूक करतात. अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्या ओळखपत्राचा वापराद्वारे नवीन सिम कार्ड घेऊन मोबाइल क्रमाकांचा गैरवापर केला जातो. आधार कार्डच्या मदतीने नवीन सिम कार्ड घेणे अगदी सोपे आहे. आणि त्याचा वापर करून गुन्हेगार आपले बँक खाते सहज रिकामे करू शकतात. त्यामुळे तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? हे आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो.

आधार, पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन्स यांचा उपयोग गुन्हेगार कसे करतात?
1) ओळखपत्रावरील माहितीमध्ये बदल करणे. 
2) ओळखपत्रावरील फोटो, पत्त्यात बदल करणे. 
3) कर्जासाठी, बँक खाते उघडण्यासाठी उपयोग.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत?
1) दूरसंचार विभागाने (DoT) एक पोर्टल सुरू केले आहे. 
2) सर्वप्रथम tafcop.dgtelecom.gov.in हे पोर्टल Open करावे.
3) या पोर्टलवर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. 
4) त्यानंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल.
5) OTP टाकून Submit बटनावर Click करावे.
6) तुमच्या आधारवर रजिस्टर असलेल्या सर्व फोन नंबर्सची माहिती मिळेल.

कोणती माहिती तपासावी ?
1) क्रेडिट रिपोर्ट पाहून संशयास्पद रक्कम तपासा.
2) रजिस्टर फोन नंबर आणि ईमेलची मिळावा.

तक्रार कुठे करावी?
एखादा नंबर तुम्हाला अनधिकृत वाटत असल्यास तुम्ही DoT कडे तक्रार करून तुमचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करू शकता. तसेच, तुम्हाला जर कोणतीही माहिती संशयास्पद वाटल्यास क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधू शकता. तसेच, पोलिसात देखील तक्रार करू शकता. त्याचबरोबर आपण दर तीन महिन्यांनी मोफत क्रेडिट रिपोर्टची माहिती मिळवू शकता.

Post a Comment

0 Comments