Subscribe Us

इयत्ता १ली दाखल पात्र विद्यार्थी प्रवेश वय (सन 2022-23)

इयत्ता १ली दाखल पात्र विद्यार्थी प्रवेश वय (सन 2022-23) 


विषय - सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत..!!

मा. शिक्षण संचालक (प्राथ) 
दिनांक 20.12.2021 पत्रानुसार मार्गदर्शन -
1) शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये इयत्ता 1ली मध्ये प्रवेश देण्यासाठी बालकाची जन्मतारीख 01.10.2015 ते 31.12.2016 या कालावधीतील असावी.
2) दिनांक 01.10.2015 ते 31.12.2016 या कालावधीतील जन्मतारीख असलेल्या बालकांना आपण जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देऊ शकतो.
3) 30 सप्टेंबर 2015 व त्यापूर्वीची जन्मतारीख असलेल्या बालकांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत लवचिकता ठेवावी किंवा अशा बालकांना वयानुसार इयत्ता दुसरीमध्ये प्रवेश देणे योग्य होईल.
4) सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी १ ऑक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान जन्मलेल्या आणि वयाची ६ वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी पहिली प्रवेशासाठी पात्र असल्याचे स्पष्टीकरण संचलनालयाकडून देण्यात आले आहे. राज्यातील सर्व मंडळाच्या शाळांना २०२२-२३ मधील नर्सरी, पहिली प्रवेशांसाठी हा लागू राहणार आहे.

टीप - मा. शिक्षण संचालक (प्राथ) यांनी दिनांक 28.02.2022 च्या सुधारित पत्रामध्ये RTE 25 % प्रवेशाबाबत शिक्षक बांधवांमध्ये इ. 1ली प्रवेशाबाबतची संभ्रमावस्था दूर करून हे पत्र फक्त RTE प्रवेशाबाबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

परिपत्रक वाचा व Download करा.

इयत्ता 1ली किमान व कमाल वयोमर्यादा -

शासन निर्णय दिनांक 11.06.2010 नुसार 
इ.1 ली प्रवेशाबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. यानुसार शाळा प्रवेशासाठी बालकाची वयोमर्यादा 6 वर्षे निश्चित करण्यात आली होती. परंतु या शासन निर्णयात 5 वर्षे वय पूर्ण झालेले बालकही प्रवेशास पात्र असतील असे स्पष्ट नमूद केले होते.

शासन निर्णय दिनांक 21.01.2015 व 
शुद्धीपत्रक दिनांक 23.01.2015 नुसार 
या शासन निर्णयामध्ये बालकाचे शाळा प्रवेशाचे वय हे 6 वर्षे निश्चित करण्यात आले आणि त्यासाठी 31 जुलै हा मानिव दिनांक निश्चित करण्यात आला.

शासन निर्णय दिनांक 25.01.2017 नुसार 
या शासन निर्णयामध्ये बालक प्रवेशाचे वय 6 वर्षे निश्चित करण्यासाठी मानिव दिनांक दुरुस्त करून तो 30 सप्टेंबर असा निश्चित करण्यात आला.

शासन निर्णय दिनांक 25.07.2019 नुसार 
या शासन निर्णयामध्ये मानिव दिनांकात आणखी 15 दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले. म्हणजेच 2020-21 या शैक्षणिक वर्षापर्यंत आपण 15 ऑक्टोबर या दिनांकापर्यंत 6 वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकांना इ.1 ली मध्ये प्रवेश देऊ शकत होतो.

शासन निर्णय दिनांक 18.09.2020 नुसार -
राज्यातील पालकांचा आग्रह आणि लोकभावनेचा विचार करून शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित केला. यामध्ये शाळा प्रवेशासाठी 6 वर्षे वय पूर्ण होण्यासाठीचा मानिव दिनांक 31 डिसेंबर असा करण्यात आला आहे.
1) 31 डिसेंबर पर्यंत 6 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या बालकांना आपण जून महिन्यात इ. 1ली मध्ये प्रवेश देऊ शकतो. 
2) या शासन निर्णयाची अंमलबजावणी 2021-22 या शैक्षणिक वर्षापासूनच सुरु करण्यात आली आहे.
3) जून 2022 मध्ये इ.1 ली मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बालकाची जन्मतारीख ही 6 वर्षे पूर्ण होण्यासाठी 31.12.2016 हि तारीख ग्राह्य धरण्यात आली आहे. 
4) या शासन निर्णयांमध्ये बालकाची इ. 1ली प्रवेशाबाबत किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

आजपर्यंतचे सर्व GR Download करा.

Post a Comment

0 Comments