Subscribe Us

RTE 25% आरक्षण ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (सन 2022-23) | RTE 25% Reservation 2022-23

RTE 25% आरक्षण ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (सन 2022-23) | RTE 25% Reservation 2022-23

Admission Portal : RTE 25% Reservation
For Academic Year: 2022-2023

Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2022-23 साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक 16/02/2022 पासून होत आहे. गोंदिया जिल्हा दुपारी 3 नंतर सुरू होत आहे. उर्वरित जिल्हे दिनांक 17/02/2022 दुपारी 3 नंतर अर्ज भरू शकतील.

🛑 RTE ठळक मुद्दे :-
◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery, Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत.
◼ कुठलेही शुल्क नाही.
◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.
◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.
◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.
◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी.
◼ R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश.

📣 R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी) येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
◼ पाल्याचा जन्माचा दाखला
◼ पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो
◼ पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)
◼ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)

🏡 रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे..!!
◆ आधार कार्ड
◆ पासपोर्ट
◆ निवडणुक ओळखपत्र
◆ वीज बील
◆ घरपट्टी, Tax पावती
◆ पाणीपट्टी
◆ वाहन चालवण्याचा परवाना

📱ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी खालील बटनाला स्पर्श करा..!!
📱ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा करावा? याकरिता खालील Video बघा..!!

🛑 RTE २५% प्रवेश अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत :-

1) रहिवासीचा वास्तव्याचा पुरावा:- यामध्ये रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स टेलीफोन बील, पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी गॅस बँक पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक.

2) सामाजिक वन ची जात संवर्गातील असल्यास प्रमाणपत्र:- यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी /उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकाचा किंवा वडिलांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. यामध्ये परराज्यातील प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जात नाही.

3) दिव्यांग (अपंग) असल्यास आवश्यक कागदपत्रे:- यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयात 40% पेक्षा जास्‍त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र.

4) HIV बाधित किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे:- जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र.

5) आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचा दाखला:- तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा एम्प्लॉयर चा दाखला. (उत्पन्नाची मर्यादा एक लाखापेक्षा कमी)

6) सर्व प्रवेश पात्र बालकांसाठी जन्माचा दाखला:- यामध्ये ग्रामपंचायत/ नगरपरिषद /महानगरपालिका यांचा दाखला/ रुग्णालयातील एन एम यांचे रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी/ बालवाडी रजिस्टरमधील दाखला/ आई-वडिलांचा पालकांनी प्रतिज्ञा द्वारे केलेले स्वयम् निवेदन यापैकी एक कोणताही जन्माचा दाखला.

7) घटस्फोट महिलाच्या पाल्यासाठी:- प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बालकाची आई जर घटस्फोटीत महिला असेल तर न्यायालयाचा निर्णय/ घटस्फोटीत महिलाचा रहिवासी दाखला.

8) न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्पोटा प्रकरणातील महिलेचे पाल्य असल्यास आवश्यक कागदपत्रे:- घटस्फोटाची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल दुर्बल गटात असल्यास पालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

9) बालकाची आई विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे:- पतीचे मृत्युपत्र /मृत्यू प्रमाणपत्र, बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास पालकाची किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल दुर्बल गटात मोडत असल्यास आईचा उत्पन्नाचा दाखला.

10) एकल पालकत्व असल्यास आवश्यक कागदपत्रे:- आई किंवा वडील या पैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे.

11) अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे:- बालगृह अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालय ची कागदपत्रे गृहीत धरण्यात यावी जर बालक अनाथालयात राहत नसेल तर पालक त्याचा सांभाळ करतात याचे हमीपत्र आवश्यक राहील.

दि १६ फेब्रुवारी २०२२ पासून RTE 25% आरक्षणाचे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा. आणि हि माहिती अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पाठवावी..!!

Post a Comment

0 Comments