Subscribe Us

ऑनलाईन शिक्षक बदली- 2022 (मोबाईल सॉफ्टवेअर) New Update

ऑनलाईन शिक्षक बदली- 2022  (मोबाईल सॉफ्टवेअर)  New Update


सरल पोर्टल अद्याप ओपन झालेले नाही येत्या काही दिवसातच सरल पोर्टल कार्यान्वित होईल आणि सर्व शिक्षक मोबाईल सॉफ्टवेअर द्वारे बदली प्रक्रियेचा लाभ घेऊ शकतील. शिक्षकांना ऑनलाईन बदली प्रक्रिये पूर्वी खालील माहिती सरल पोर्टलवर अपडेट करावी लागणार आहे..!!

मोबाईल सॉफ्टवेअर बद्दल महत्वाचे :-

माननीय आयुष प्रसाद (अध्यक्ष, बदली समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली 8 फेब्रुवारी 2022 ला सॉफ्टवेअर सादरीकरणाबाबत बैठक झाली त्या बैठकीदरम्यान चर्चिले गेलेले विषय खालीलप्रमाणे- 👇

1) गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या बदल्या यावर्षी नक्कीच होणार आहेत महत्त्वाचे म्हणजे बदली करिता लागणारे मोबाईल ॲपचे काम पूर्णत्वास आलेले आहे त्यामुळे येत्या मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला बदली प्रक्रियेला सुरुवात होईल.

2) तत्पूर्वी मुख्याध्यापकांना आणि सर्व शिक्षकांना आपली सरल पोर्टल वरील खालील 👇 माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे.
अ) शिक्षकांचे मोबाईल क्रमांक
ब) ई-मेल आयडी
क) आधार क्रमांक
ड) सरल पोर्टल वरील शिक्षक माहिती

3) जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही संपूर्णपणे मोबाईल ॲपच्या माध्यमातून राबवली जात असल्यामुळे वरील माहिती व सरल पोर्टलवर शिक्षकांत संदर्भात असलेली माहिती अपडेट करून घ्यावी. स्टॉप आयडी च्या माध्यमातून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

4) सर्व शिक्षकांनी आपली माहिती सरल पोर्टल वर भरतांना अपडेट असलेला ईमेल आयडी व नेहमी वापरात असलेला मोबाईल क्रमांक सरल पोर्टल वर अपडेट करून घ्यावा जेणेकरून त्यावर येणारे OTP तसेच बदली संदर्भातील येणारी माहिती आपल्याला कळण्यास मदत होईल.

बदली सॉफ्टवेअर बद्दल महत्वाचे :-

1) बदली प्रक्रिया करीता शिक्षकांची लागणारी माहिती ही शालार्थ आणि सरल पोर्टलवरून घेण्यात येणार आहे.

2) शिक्षकांना प्रशिक्षण हे याच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरुन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

3) या सॉफ्टवेअरमध्ये आयपी ऍड्रेस आणि लॉगिन संदर्भात संपूर्ण माहिती संग्रहित केली जाणार आहे.

4) प्रत्येक शिक्षकाची माहिती भरतांना सहा अंकी PTP घेऊन ती अधिकृत केली जाणार आहे.

5) बदली सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी यांच्या सुरक्षेबाबत मान्यताप्राप्त त्रयस्थ संस्थेमार्फत याची तपासणी केली जाणार आहे.

6) हे मोबाईल सॉफ्टवेअर इंग्रजी आणि मराठी भाषेत अपडेट केलेले असून यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.

7) बदली सॉफ्टवेअर हे मोबाईल किंवा संगणकाद्वारे वापर करता येऊन हे सॉफ्टवेअर वापरण्यास अतिशय सुलभ सोपे व अतिशय वेगवान राहील.

8) या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व शिक्षकांची माहिती ही एका डॅशबोर्डवर एकमेकांना दिसणार आहे त्यामुळे कोणीही चुकीची माहिती भरल्यास आक्षेप घेण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

9) या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन संपूर्ण शिक्षकांचा डेटा संग्रहित केला जाणार आहे.

10) शिक्षकांना या सॉफ्टवेअर मध्ये आपण भरलेली माहिती बदलविण्याची विनंती करू शकतात.

अशाप्रकारे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिक्षकांना आपल्या बदलीचा अर्ज भरण्यापासून ते बदली झालेल्या ठिकाणाचा आदेश मिळेपर्यंत आपल्या मोबाईल वरून माहिती पाहता येणार आहे.

🎯जिल्हांतर्गत शिक्षक बदली-2022
     (Software New Update)
👉 बदली सॉफ्टवेअर तयार..!!
👉 कशाप्रकारे बदल्या होतील❓

📱सॉफ्टवेअर डेमो व्हिडिओ बघा👇

🎯जिल्हांतर्गत बदली GR व पत्रक..!!
🔖दिनांक निहाय वाचन किंवा डाउनलोड करण्याकरीता खालील 👇 लिंकला स्पर्श करा.

1https://bit.ly/बदलीGR_07-04-21

➡️आपल्या मित्रांना हि माहिती अवश्य पाठवा..!!

Post a Comment

0 Comments