Subscribe Us

(इ.१२वी) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षा वेळापत्रकात अंशत: बदल | HSC EXAM-2022

(इ.१२वी) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षा वेळापत्रकात अंशत: बदल | HSC EXAM-2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेच्या वेळापत्रकातील अंशत: बदलाबाबत

!! प्रकटन !!

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षा दि. ०४/०३/२०२२ ते दि. ३०/०३/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे.

    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (General & Biofocal) आणि व्यावसायिक (M.C.V.C.) वेळापत्रकातील दि. ०५ मार्च २०२२ व दि. ०७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयाच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखा ऐवजी अनुकमे दि. ०५ एप्रिल २००२ व दि ०७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. सदर विषयांच्या परीक्षाबाबत सुधारित तारखा व वेळ पुढीलप्रमाणे असेल.


12वी (HSC) 2022 बदलासह नवीन वेळापत्रक Download करण्यासाठी खालील बटनाला स्पर्श करा..!!

    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व संबंधीत उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.

(डॉ अशोक भोसले)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे ४.

Post a Comment

0 Comments