Subscribe Us

आधार कार्डमध्ये कोणते बदल करता येणार? मोबाईलवर बदल कसे करावे?

आधार कार्डमध्ये कोणते बदल करता येणार? मोबाईलवर बदल कसे करावे?

Aadhaar Card मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही आता तो तुमच्या मोबाइलवरून करू शकता. यासाठी तुम्हाला फार चिंता करण्याची गरज नाही. ऑनलाइन बदल करण्यासाठी फक्त तुमच्याकडे मूळ कागदपत्रे (Original Document) असायली हवीत. जाणून घ्या संपूर्ण माहिती..!!

🤷‍♂️ आपण खालील बदल करू शकता?
आधार कार्डमध्ये केवळ नाव नव्हे तर जन्मतारीख, घराचा पत्ता, मोबाइल नंबर सुद्धा बदलता येवू शकतो. आधार कार्डमधील आपले नाव बदलण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या आधार कार्डमध्ये रजिस्टर नंबर असायला हवा. तसेच मोबाइलमध्ये इंटरनेट. जाणून घ्या आधार कार्डवरील काही बदल करायचा असेल तर सोपी पद्धत कोणती आहे. अवघ्या काही मिनटात आधार कार्डवरील नाव, पत्ता, बदलू शकता.

🤷‍♂️  किती वेळा करता येईल बदल ?
● नाव - दोन वेळा करेक्शन करता येणार.
● जन्म तारीख - एकदाच करता येणार करेक्शन.
● पता - यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
● लिंग - केवळ एकदाच बदल करता येणार.
● मोबाइल नंबर - कोणतीही मर्यादा नाही.
● फोटो - कितीही वेळा बदलता येणार.
(UIDAI ने असे स्पष्ट सांगितले आहे.)

🤷‍♂️ आधार कार्डमध्ये ऑनलाइन बदल कसा करावा?
1) सर्वात आधी Aadhaar Card च्या ऑफिशल वेबसाइट uidai.gov.in जा.
2) होमपेजवर तुम्हाला आधी MY Aadhaar ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.
3) आता तुम्हाला Update Your Aadhaar सेक्शन मध्ये जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला एक कॉलम दिसेल.
4) Update your Demographics Data Online यावर क्लिक करा.
5) यानंतर तुम्ही UIDAI च्या सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर ssup.uidai.gov.in पोहोचाल.
6) या ठिकाणी तुम्हाला तुमचा १२ डिजिट आधार नंबरने लॉग इन करावे लागेल.
7) यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या कॅप्चेला भरा. आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा. यानंतर आपल्या रजिस्टर मोबाइल नंबर वर ओटीपी येईल.
8) ओटीपी टाकल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यात तुम्ही आपली वैयक्तिक माहिती, जसे, पत्ता, जन्मतारीख, नाव, जेंडर, सह अन्य माहिती भरावी लागेल.
9) आता तुम्हाला त्या सेक्शनला निवडावे लागेल. ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे. तुमच्यासमोर नाव, जन्मतारीख, पत्ता बदल करण्याचे ऑप्शन असतील. ज्यात बदल करायचा आहे. त्यातील अपडेट नाववर क्लिक करा.
10) या ठिकाणी नावाला अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे एक आयडी प्रूफ असणे गरजेचे आहे. आयडी पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदान कार्ड, रेशन कार्ड अपलोड करू शकता.
11) सर्व डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल. त्याला व्हेरिफाय करावे लागेल. त्यांतर सेव्ह चेंज करावे लागेल.

Post a Comment

0 Comments