Subscribe Us

NAS (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण) Exam - 2021 स्वरूप व आयोजन..!!

NAS (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण) Exam - 2021 स्वरूप व आयोजन..!!


दिनांक - 12 नोव्हेंबर (शुक्रवार) 2021
इयत्ता - 3री, 5वी, 8वी व 10 वी

NAS EXAM - 2021 आयोजनाबाबत सूचना -
(राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण - National Achievement Survey)
    भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण राज्यभरात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी National Achieverment Survay (NAS) 12 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण राज्यभरात घेण्यात येणार आहे.

📚NAS EXAM बद्दल थोडक्यात -
1) संपूर्ण देशभरात प्रत्येक जिल्ह्यातील इ. 3 री आणि 5 वी च्या प्रत्येकी 61 वर्गांवर व 8 वी च्या 51 वर्गावर हे सर्वेक्षण होणार आहे.
2) प्रत्येक जिल्ह्यातील एकूण 173 वर्गावर National Achievement Survey सर्वेक्षण होणार आहे.
3) NAS ह्या सर्वेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यानी स्वतः Random पद्धतीने निवडलेले आहेत.
4) शाळा निवडतांना NCERT कडून s, r1 आणि r2 या प्रकारात शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
5) s (selected), r1 (reserve ) आणि r2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार शाळा फायनल केल्या जातील.
6) या सर्वेक्षणाअंतर्गत निवडलेल्या शाळेतील निवडलेल्या वर्गामध्ये दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी चाचणी होणार आहे.

📚NAS EXAM चाचणीचे स्वरूप -
1) Objective / MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न NAS या चाचणी मध्ये असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.
2) इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 60 मिनीट)
3) इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)
4) NAS चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणार आहेत.

📚राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचे आयोजन -
1) या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर DMU (District Monitoring Unit) स्थापन केले आहे. यामध्ये DIECPD प्राचार्य / शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.
2) चाचणीच्या दिवशी हे DMU भरारी पथक म्हणून जिल्हास्तरावर काम करेल, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे.
3) चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. याच्या मार्फत संबंधित वर्गाची चाचणी शाळानी घ्यावयाची आहे. 
4) आपल्या शाळासाठी उपलब्ध करून दिलेले पर्यवेक्षक (F1) चाचणीच्या एक-दोन दिवस अगोदर आपल्या शाळेला भेट देतील व शालेय स्तरावर झालेल्या चाचणी संबंधीच्या नियोजनाची पाहणी करतील.
5) प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी चाचणीच्या एक दिवस अगोदर जिल्हा / तालुका स्तरावरून सीलबंद स्थितीमध्येच ताब्यात घ्यायच्या आहेत.
6) आपल्याला मिळालेल्या सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका या पर्यवेक्षका समोरच बाहेर काढायच्या आहेत व त्यावर पर्यवेक्षकाची व दोन साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यायची आहे.
7) निवडलेल्या वर्गातील जास्तीत जास्त 30 विद्यार्थ्यासाठी चाचणी होणार आहे. मात्र वर्गाची पटसंख्या 30 पेक्षा जास्त असतील तरीही चाचणीच्या दिवशी 100% (सर्व) विद्यार्थ्यांना हजर ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी शाळेची आहे.
8) चाचणी सोडवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे चाचणीच्या दिवशी निळा / काळा बॉलपेन असावा असे नियोजन शाळेने करावयाचे आहे.
9) निवडलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शाळेने आपल्या दप्तरी ठेवून चाचणी दिवशी आलेल्या पर्यवक्षकाकडे द्यायचे आहे.
10) चाचणी पूर्ण झाल्यावर पर्यवेक्षकाच्या मदतीने प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व इतर साहित्याचे used व unused प्रकारात वर्गीकरण करून ते दोन वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करायचे आहेत.
11) उत्तरपत्रिकांचे सीलबंद लिफाफे राज्यस्तरावर पाठविले जाणार आहेत.

📚NAS Exam Result -
1) परीक्षेच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावर OMR पद्धतीने होईल.
2) प्रत्येक तालुकानिहाय निकाल वेबसाइटवर NAS च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
3) यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल, राज्यातील / जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे पुढे आहे हे समजेल.
4) आलेल्या निकालावरून NCERT, SCERT आणि DIECPD यांचेकडून अंमलबजावणी संबंधित तालुक्यांना करावयाची आहे.

Post a Comment

1 Comments