Subscribe Us

सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर "ब्रेक दी चेन"
सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु
महाराष्ट्र शासन 
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग 
दिनांक : ११ ऑक्टोबर, २०२१

विषय :-
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर "ब्रेक दी चेन" अंतर्गत बंदिस्त सभागृहे / मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे..!!

शासन निर्णय :-
१) कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट-अ मधील मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून दिनांक २२ ऑक्टोबर, २०२१ पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासन मान्यता देत आहे.

२) सर्व संबंधितांनी बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रमांचे परिचालन, कोविड- १९ संदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधांचा भंग होणार नाही अशा पध्दतीने करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द नियमानुसार संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून कारवाई करण्यात येईल.

३) कोविड १९ विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना या प्रकरणीही लागू राहतील.

४) सदर शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन प्रभाग) यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. 
५) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२११०१२११०६२५७२२३ असा आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार
(विलास रा. थोरात) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन

सहपत्र - परिशिष्ट "अ" 
१) बंदिस्त सभागृहात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम.
२) मोकळया जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम.

📱मार्गदर्शक तत्वे वाचा व Download 👇 करा..!!

Post a Comment

0 Comments