Subscribe Us

वाचन प्रेरणा दिन उपक्रम "डिजिटल अभिवाचन स्पर्धा"

वाचन प्रेरणा दिन उपक्रम "डिजिटल अभिवाचन स्पर्धा"
Reading Inspiration Day Initiative "Digital Advocacy Competition"

    डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा  केला जातो. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून "डिजिटल अभिवाचन स्पर्धा" आयोजन करण्यात आली आहे.

स्पर्धेचे नियम आणि अटी :-
* मराठी साहित्यातील कोणत्याही ललित लेखाचं (उताऱ्याचं) अभिवाचन स्पर्धक करु शकतात. 
* लेख स्वलिखित किंवा प्रथितयश लेखकांचा असेल तरीही चालेल. 
* ब्लॉग लेखन असलेला उतारा असला तरीही  चालेल. 
* ललित लेखनाच्या विषयाला कुठलेही बंधन नाही.

डिजिटल अभिवाचन स्पर्धेचा विषय :-
मराठी साहित्यातील ललित लेखन अंतर्गत उतारा वाचन.

व्हिडीओची वेळ :-
व्हिडिओ 3 ते 5 मिनिटांचा असावा. 
(5 मिनिटापेक्षा अधिक नसावा).

डिजिटल अभिवाचन स्पर्धेचे गट :-
(डिजिटल अभिवाचन स्पर्धा 3 गटात होईल.)
गट क्र. 1 : वयोगट 5 ते 15
गट क्र. 2 : वयोगट 15 ते 30
गट क्र. 3 : वयोगट 30 वर्ष

स्पर्धकांना महत्त्वाच्या सूचना :-
व्हिडीओ पाठवताना मेलमध्ये संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि स्पर्धेचा गट ही सर्व माहिती नमूद करावी. 
(स्पर्धकांनी या माहितीशिवाय मेल पाठवल्यास तो  ग्राह्य धरल्या जाणार नाही)

स्पर्धेसाठी व्हिडिओ कसा तयार करावा ?
* अभिवाचन सुरु करण्याआधी आपले नाव सांगावे. 
* निवडलेल्या ललित उताऱ्याचा विषय संगावा.
* व्हिडीओ शूट करतांना फोन आडवा धरावा.
* मागील बाजू प्लेन असून एका रंगाची असावी.
* मधेच कोणता आवाज येणार नाही असे बसावे.
* आपला आवाज स्पष्ट ऐकू येणारा असावा.

व्हिडीओ कोठे पाठवावा ? 
डिजिटल अभिवाचन स्पर्धेचा व्हिडिओ abhivachan.miti@gmail.com या ईमेल वर पाठवावा. ड्राईव्ह वरून व्हिडीओ जात नसल्यास wetransfer.com किंवा transferxl.com या Site वरून व्हिडीओ पाठवू शकता.

स्पर्धेच्या बक्षिसांचे स्वरुप :-
(रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि पुस्तकं.)

विजेत्या स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ कार्यक्रमात वापरले जातील आणि इतर काही निवडक स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक पेजवर, मिती क्रिएशन ग्रुपच्या फेसबुक पेजवर आणि युट्युब चॅनलवर तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील..!!

अधिक माहितीसाठी 9930115759 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपण या क्रमांकावर फोन करून आवश्यक ती माहिती मिळवू शकता आणि आपल्या शंकांचे निरसन करू शकता..!!

Post a Comment

0 Comments