Subscribe Us

HSC (12वी) बोर्ड परीक्षा निकाल-2022 पुनर्मुल्यांकन (Rechecking) सुविधा उपलब्ध..!!

HSC (12वी) बोर्ड परीक्षा निकाल-2022 पुनर्मुल्यांकन (Rechecking) सुविधा उपलब्ध..!!


पुनर्मुल्यांकन (Rechecking) सुविधा-

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने बुधवार 8 जून,2022 रोजी HSC (12 वी) निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पुन्हा तपासणी करावयाची असेल त्यांच्यासाठी बोर्डामार्फत पुनर्मूल्यांकनाची (Rechecking) सुविधा वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या 10 जून, 2022 पासून विद्यार्थ्यांना Online अर्ज करता येणार असून पेपर Rechecking साठी ऑनलाईन शुल्कही भरावे लागणार आहे.


अर्ज कसा करावा ?

1) विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुर्नमूल्यांकनासाठी सर्वप्रथम खालील Click Here या बटनाला स्पर्श करावे.
2) या वेबसाईटवर सर्व सूचना, माहिती, अटी व शर्ती एकदा वाचून घ्याव्यात. 
3) या अर्जासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीय किंवा नेट बँकिंग पद्धतीने शुल्क करता येणार आहे.
4) विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी १० जून, २०२२ ते २० जून २०२०२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
5) विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित असून ५० रुपये शुल्क आकरण्यात येईल.
6) मार्च-एप्रिल २०२२ च्या परिक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका इमेलेद्वारे, ऑनलाईन, घरपोच असे पर्याय देण्यात आले आहे.
7) उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये शुल्क असणार आहे आणि हे शुल्क विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरता येणार आहे.
8) ज्या विद्यार्थ्यांना फक्त गुण पडताळणी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क असणार आहे.

अतिशय महत्वाचे :-

ज्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आता JEE आणि NEETची परीक्षा द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी तसेच रिव्हॅल्युशन म्हणजेच पुर्नमूल्यांकनाची फोटोकॉपी लगेच मिळणार आहे. यासाठी शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळाना सूचना जारी केली असून माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकण करून विद्यार्थ्यांना प्राधान्याने मिळणार आहे.


महत्त्वाच्या तारखा :-

10 जून ते 20 जून - पेपर्स Rechecking अर्ज करण्याचा कालावधी.

10 जून ते 29 जून - उत्तपत्रिका प्रिंटसाठी अर्ज करण्याचा कालावधी.

10 जून - पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सुरु होण्याची तारीख.

17 जून - विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजतापासून मार्कशीट मिळणार.

Post a Comment

0 Comments