Subscribe Us

शिक्षक बदली प्रक्रिया- 2022 | तीन Phase मध्ये होणार बदली | Phase 1 PDF

शिक्षक बदली प्रक्रिया- 2022 | तीन Phase मध्ये होणार बदली | Phase 1 PDF


शिक्षक बदली प्रक्रिया व तीन Phase :

जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया ही online होणार असून या बदल्या 3 Phase मध्ये होणार आहेत. बदली संदर्भात Phase 1 लवकरच सुरू होणार आहे. Phase 1 पूर्ण झाल्यानंतरच Phase 2 व 3 सुरू करण्यात येईल.

1) Phase 1: शिक्षक माहिती Updation
2) Phase 2: आंतरजिल्हा बदली
3) Phase 3: जिल्हांतर्गत बदली



1) Phase 1 : शिक्षक माहिती Updation -

Phase 1 मध्ये शिक्षकांच्या सेवा विषयक माहितीचे Updation असल्यामुळे शिक्षकांना खालील प्रकारे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

1) सर्वप्रथम शिक्षकांना त्यांचा मोबाईल नं. व OTP ने लॉगीन करावं लागेल.

2) त्यानंतर तिथे आपणास शिक्षक माहितीचे दोन भाग दिसतील.
i) Personal Information
ii) Employee Information

i) Personal Information -
हि माहिती Read Only Mode मध्ये असेल तिथे आपणास कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. ती माहिती फक्त आपण वाचू शकणार आहे.

ii) Employee information -
◆ यामध्ये आपण आपल्या कार्यरत शाळेतील तपशील, एकूण सेवेचा तपशील, तसेच इतर सेवेसंबंधी माहिती बदलू शकतो किंवा नवीन Add करू शकतो, बरोबर असल्यास माहिती Accept करावी व त्रुटी दिसल्यास दुरुस्ती करून Submit करावी.

◆ संपूर्ण माहिती तपासून Submit केल्यानंतर ही माहिती मान्यतेकरीता गटशिक्षणाधिकारी (BEO level) यांच्याकडे पाठविली जाईल.

◆ गटशिक्षणाधिकारी (BEO) सेवापूस्तकांनुसार माहिती तपासून Approved करतील. तसेच आलेली माहिती चूक आढळल्यास दुरूस्ती करतील.

◆ सदर माहिती शिक्षक लॉगीनला दिसेल. ती माहिती बरोबर असल्यास शिक्षकांनी Accept करावी.

◆ गटशिक्षणाधिकारी (BEO ) यांनी दुरुस्त केलेली माहिती योग्य असल्यास Accept करावी. माहिती मान्य नसल्यास शिक्षक आपल्या माहितीमध्ये बदल करून EO कडे अपील करू शकतील.

◆ शिक्षणाधिकारी (EO) कडे आलेली माहिती, शिक्षणाधिकारी (EO ) योग्य पुराव्यानिशी माहिती Approved किंवा बदल करतील.

◆ अशाप्रकारे शिक्षणाधिकारी यांनी बदल केलेली शिक्षकांची Profile शिक्षक पुन्हा बदलू शकणार नाहीत. ती माहिती शिक्षकांना Read Only Mode वर दिसेल आणि शिक्षणाधिकारी (EO) नी मंजूर केलेली माहिती आता Final असेल.

◆ तसेच सर्व शिक्षकांची माहिती सुद्धा प्रत्येक शिक्षकांना आपल्या Login मध्ये बघता येईल. एखाद्या शिक्षकांस दुसऱ्या एखाद्या शिक्षकांच्या माहितीमध्ये दोष दिसल्यास त्यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कडे Social अपील करता येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) योग्य पुराव्यानिशी सदर शिक्षकांच्या माहिती मध्ये योग्य बदल करतील.


महत्वाच्या सूचना -

1) अशाप्रकारे Phase 1 प्रत्येक शिक्षकांना दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करणे गरजेचे आहे.

2) अंतिम दिनांकापर्यंत शिक्षकांनी आपली माहिती Accept न केल्यास गटशिक्षणाधिकारी (BEO) आपल्या अधिकाराचा वापर करून सर्व शिक्षकांची माहिती Approved करतील. त्यानंतर शिक्षकांना आपली माहिती Update करण्याची संधी मिळणार नाही.

3) प्रत्येक क्षणी व प्रत्येक स्तरावर माहिती Update करतांना OTP आवश्यक असणार आहे.

4) बदली प्रक्रियेत कुठल्या स्तरावर काय? कसे बदल केले? याची संपूर्ण माहिती शिक्षकांना E-mail वर तसेच Login मध्ये कळेल.

5) सन 2022 मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.

6) बदली प्रक्रियेमध्ये शिक्षक कार्यान्वित केलेल्या मोबाईल ॲप द्वारे किंवा कम्प्युटर सेंटर वरून माहिती भरू शकतील

अद्याप फक्त बदली प्रक्रियेतील Phase 1 संबंधित माहिती देण्यात आलेली आहे, प्रत्यक्ष बदली प्रक्रिया ही वेळापत्रक जाहीर करून करण्यात येईल..!!

Post a Comment

0 Comments