Subscribe Us

शालार्थ Password कसा Reset करावा? पगार स्लीप Download कशी करावी?

शालार्थ Password कसा Reset करावा? पगार स्लीप Download कशी करावी?


शिक्षकांना विविध उपयुक्त कामाकरिता Salary Slip (पगार पत्रक) ची आवश्यकता असते. आपले पगार पत्रक मोबाईलवरून सहज डाउनलोड करता यावे, पाहता यावे तसेच Password Reset करता यावा याकरिता खालील प्रक्रिया पूर्ण करा..!!

1) सन 2019 पासून प्रत्येक महिन्यांची Salary Slip ऑनलाईन पाहण्यासाठी, पगार पत्रक डाउनलोड करण्यासाठी व Password Reset करण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
(यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID (पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID) जो 02DED ने सुरू होतो तो आवश्यक आहे.)

2) यानंतर खालील प्रमाणे प्रोसेस करा. त्याकरिता ifms123 हा Default पासवर्ड आहे.

👉शालार्थ पे बिल Password Reset कसा करावा?
👉Salary Slip Online कशी पहावी ? 
👉(पगार पत्रक) कसे Download करावे?

शालार्थ User Manual pdf Download करा.

3) जर पासवर्डने लॉगिन होत नसेल तर आपल्या मुख्याध्यापक (शाळेच्या) लॉगिन मधून पासवर्ड रिसेट करता येईल.
A) आपला पासवर्ड शालार्थ ID टाकून Reset करा. शालार्थ ID टाकल्यावर आपले नाव येईल. ते बरोबर असल्याची खात्री करा.

B) पासवर्ड रिसेट केल्यानंतर Default पासवर्ड ifms123 पासवर्ड मिळेल. यानंतर परत आपल्याला शालार्थ वेबसाईटवर येऊन आपला शालार्थ ID व वरील पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.

C) शालार्थमध्ये लॉगिन झाल्यानंतर आपणास नवीन पासवर्ड सेट करावा लागेल. पासवर्ड इतरांशी शेअर करू नका. पासवर्ड सेट करताना अक्षरे, सांकेतिक चिन्हे व अंक यांचा वापर करून स्ट्रॉंग पासवर्ड बनवा.

D) आपण तयार केलेल्या पासवर्डने परत एकदा लॉगिन करा.

E) यानंतर आपल्याला EMPLOYEE CORNER हि एकच टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.

F) यानंतर आपले नाव समोर येईल. त्याखाली आपल्याला वर्ष व महिना निवडायचा आहे. त्यानंतर view slip यावर क्लिक करा.

G) निवडलेल्या महिन्याची आपल्याला Salary Slip दिसेल. ती सेव्ह करा किंवा प्रिंट काढा. यावर कोणाचीही सही न घेता आपल्याला बँकेत किंवा इतर ठिकाणी वापरता येईल.

अशा पद्धतीने आपण सहज मोबाईल वरून आपली salary स्लिप ऑनलाईन पाहू शकता, पगार पत्रक डाउनलोड व Password Reset करू शकता..!!

📱अशाच उपयुक्त माहितीसाठी वेबसाईटला भेट दया.
www.mytechnoschools.com

🎯 शालार्थ पे बिल मोबाईलवर कसे पहावे? व कसे डाऊनलोड करावे?

📱खालील लिंकला स्पर्श करून संपुर्ण माहिती जाणून घ्या.👇

Post a Comment

0 Comments