Subscribe Us

स्वच्छ विद्यालय पुरस्कार (सन 2021-22)

स्वच्छ विद्यालय पुरस्कार (सन 2021-22)


नियोजन व वेळापत्रक :

मा. संचालक (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे) यांनी दिलेल्या परिपत्रकातील सुचनेनुसार भारत सरकारने दिनांक 2 ऑक्टोबर, 2014 पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे. तसेच देशातील सर्व शाळांसाठी 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान करण्यातयेत आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 साठी मार्गदर्शक सूचना तसेच शाळासाठी नामनिर्देशन करतांना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल Appच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर पुरस्काराकरिता नामांकन करणाऱ्या शाळांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे. 


1) स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय अनुदानित व खाजगी शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी नामांकन सादर करता येईल. 
2) पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर 46, राज्य पातळीवर 26 व जिल्हा पातळीवर 38 शाळांची निवड करण्यात येणार आहे. 
3) स्पर्धेकरिता निश्चित करण्यात आलेल्या सहा घटकासाठी 59 निर्देशाक निश्चित करण्यात आलेले आहेत व त्यानुसार शाळांचा प्राप्त होणारे गुण विचारात घेऊन श्रेणी देण्यात येणार आहे. 
4) सदर पुरस्कारासाठी शाळांनी नामांकन सादर करण्याची मुदत अंतिम मुदत दिनांक ३१/०३/२०२२ आहे.
5) शाळांना http://education.gov.in ---> Swacch vidyalay ---> vidyalay puraskar 2021-22 या संकेतस्थळावर 
किंवा 
6) 'गुगल प्ले स्टोअर' किंवा 'Apple App स्टोअर' वर उपलब्ध असलेल्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 या एप्लीकेशन वर शाळेचा यु-डायस कोड वापरून नोंदणी करायची आहे.

पुरस्कारासाठी स्तरनिहाय वेळापत्रक खालील प्रमाणे :
(कालावधी -- उपक्रम -- जबाबदारी)
31 मार्च, 2022 -- ऑनलाईन नामांकन सादरीकरण (शाळास्तर)
1 एप्रिल ते 15 मे, 2022 -- शाळांची पडताळणी व निवड (जिल्हा पडताळणी समिती)
22 मे, 2022 पर्यंत -- राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केलेल्या शाळांची यादी पाठवणे (जिल्हा पडताळणी समिती) 
22 मे ते 30 जून, 2022 -- राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शाळांची पडताळणी व निवड (राज्यस्तरीय पडताळणी समिती)
1 जुलै ते 7 जुलै, 2022 -- राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेल्या शाळांची यादी सादर करणे. (राज्य पडताळणी समिती) 
7 जुलै ते 7 सटेंबर, 2022 -- राज्यस्तरावरून शाळाची पडताळणी (राष्ट्रीय पडताळणी समिती)
15 ऑक्टोंबर, 2022 (जागतिक हात धुवा दिन) -- पुरस्कार प्रदान सोहळा, संभाव्य (राष्ट्रीय पडताळणी समिती) 

तरी या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शासकीय, अनुदानित व खाजगी शाळांनी सहभागी व्हावे या संदर्भात आपल्या स्तरावरून स्थानिक अधिकाऱ्यांनी सूचित करण्यात यावे, असे मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांनी परिपत्रक काढलेली आहे.

खालील परिपत्रक पहा व download करा..!!

Post a Comment

0 Comments