Subscribe Us

आधार क्रमांक आधारित संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन (सन 2021-22)

आधार क्रमांक आधारित संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन (सन 2021-22)


दिनांक :- 02/03/2022 चे शासन परिपत्रक
विषय :- सन 2021-22 संचमान्यता (सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करणेबाबत.)

दिनांक :- 08/09/2021 चे शासन परिपत्रक
विषय :- विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण (Biometric शिवाय) व संचमान्यता बाबत.

✳️ खालील समितीच्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत शालेय पडताळणी करण्यात येईल.
1) सदर पडताळणीकरीता संपूर्ण राज्यामध्ये बीट नुसार पुढीलप्रमाणे पडताळणी समिती स्थापन करण्यात येईल
2) शिक्षण विस्तार अधिकारी- [समिती प्रमुख] संबंधित बीट स्तर
3) केंद्र प्रमुख-संबंधित केंद्र/ मनपा, नपा क्षेत्रातील प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी- संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य सचिव]
4) अंगणवाडी पर्यवेक्षिका- संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य]
5) आरोग्य कर्मचारी- संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य]

✳️ खालील क्र. 1 ते 5 मध्ये दर्शविण्यात आलेल्या मुद्द्यानुसार सर्व शाळांची पडताळणी समितीमार्फत करण्यात येईल.
1) दि. 30/12/2021 रोजीच्या शाळेच्या पटावर नोंद असलेले परंतु सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे दि. 31/03/2022 पर्यंत आधार क्रमांक अपडेट झाल्यानंतर आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात येतील.
2) डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा (data) शाळास्तरावर दुरूस्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल व डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक राहणार नाहीत याची खात्री करण्यात येईल.
3)नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संचमान्यतेकरीता ग्राह्य धरण्यात येतील.
4) ज्या विद्यार्थ्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी केली आहे परंतु अद्यापपर्यंत आधार क्रमांक मिळालेला नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात येथील.
5) ज्या विद्यार्थ्याकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही व त्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी देखील केलेली नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात येतील.

➡️ वरील समितीने केंद्रातील प्रत्येक शाळेस समक्ष भेट देवून सर्व विद्यार्थ्यांची खात्री दि. 31/03/2022 पर्यंत करावी व या पत्रासोबतच्या नमुन्यात प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी यांचेकडे सादर करावे. त्याची एक प्रत केंद्र शाळेवर जतन करुन ठेवावी.
➡️ सदरील प्रमाणपत्र व विहीत माहिती सरल पोर्टलवरील केंद्र प्रमुख यांच्या लॉगीनवरुन अपलोड/नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल त्यावेळी अपलोड करावे.
➡️ गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी सरल पोर्टलवर पटाची खात्री दि. 5/04/2022 पर्यंत अंतिम करावी.
➡️ वरील शाळे पडताळणी करिता शाळा मुख्याध्यापकांनी दाखल खारीज, जन्मतारखेचे रजिस्टर, F रजिस्टर, सरल पोर्टल वर आधार क्रमांक अद्यावत केल्याची प्रिंट व ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत आधार कार्ड काढलेले नाही व त्यांनी आधार कार्ड काढण्याकरिता नोंदणी केलेले आहे अशा विद्यार्थ्यांची वर्गनिहाय नोंदणी पावती अशा प्रकारचे रेकॉर्ड अध्यावत ठेवावे.
➡️ वरील प्रमाणे सुविधा ही केवळ शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी लागू राहील.
➡️ संच मान्यता अंतिम झाल्यानंतर प्रचलित शासन निर्णय परिपत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने समुपदेशन घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दि. 31/05/2022 पूर्वी करण्यात येईल.

📱संचमान्यता निकष कोणते आहेत ?
(सन- 2021-22 करिता निकष खालीलप्रमाणे-)

Post a Comment

0 Comments