Subscribe Us

वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष शिक्षणासाठी - शिक्षक मार्गदर्शिका

वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष शिक्षणासाठी - शिक्षक मार्गदर्शिका


शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका -

    बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार शाळाबाह्य, मध्येच शाळा सोडून गेलेल्या मुलांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश दिला जात आहे. या अधिनियमानुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारलेली आहे. शासनास ही जबाबदारी शाळा व समाज यांच्या साहाय्याने पूर्ण करावयाची आहे. यासाठी शाळाबाहय मूल म्हणजे काय, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणता येईल? या मुलांचे प्राथमिक शिक्षण कसे पूर्ण करायचे, यासाठी आजपर्यंत काय काय प्रयत्न झाले. या मुलांच्या शिक्षणासाठी कायद्यात कोणकोणत्या तरतुदी आहेत. या सर्व प्रश्नाचा आपणास विचार करावा लागणार आहे. या मुलांना शिक्षणाच्या आणून त्यांना टिकवून ठेवण्यासाठी तसेच दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विविध घटकाची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.

इयत्ता 1 ली ते 8 वी च्या शिक्षकांसाठी उपयुक्त -

1) शाळेत वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
2) समकक्ष वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी. 
3) इयत्ता 1ली ते 8वी ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी.
4) वर्गोन्नती दिलेल्या विद्यार्थ्यांच्या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी.

📱 शिक्षक मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी 👇 चित्रावर क्लिक करा.

📱 शिक्षक मार्गदर्शिका आपण 👇 याठिकाणी सुद्धा वाचू शकता..!!

Post a Comment

0 Comments