Subscribe Us

(NTS) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा- 2022 इ.10 वी साठी तारीख जाहीर

(NTS) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा- 2022 इ.10 वी साठी तारीख जाहीर | NTS परीक्षा म्हणजे काय? | राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रम 2021-22

(NTS) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

अधिसूचना
जा.क्र.मरापप/NTS/इ.10 वी/2021-22/3491
परीक्षा प्राधान्य दि. 15/11/2021

प्रति,
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
जिल्हा परिषद...(सर्व)
(२) शिक्षण निरीक्षक,
बृहन्मुंबई (दक्षिण /पश्चिम /उत्तर विभाग)
(३) शिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी /महानगरपालिका /नगरपालिका...(सर्व)

विषय:- 
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२१-२२ इ. १० वी साठी राज्यस्तर परीक्षा दि. १६ जानेवारी २०२२ व राष्ट्रीयस्तर परीक्षा दि. १२ जून २०२२.

    उपरोक्त परीक्षेबाबत राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या www.mscepune.inhttp://ntsemsce.in या संकेतस्थळावर दि. १६/११/२०२१ पासून ऑनलाईन भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

उपरोक्त परिषदेच्या संकेतस्थळावरीत सूचनांचा विचार करुन शाळांनी खालील बाबी विचारात घ्याव्यात.

१. सदर परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्रे शाळेमार्फतच भरावयाची आहेत.

२. विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, जात, केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्गातीत (OBC) विद्यार्थ्यांची Non-creamy layer प्रमाणपत्र, EWS (Economically (Weaker (Section) प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्र इ. सत्यप्रती व आवश्यक परीक्षा शुल्क संकलन करणे.

३. शाळा सलग्नता शुल्क रु. २००/- प्रतिसंस्था, प्रति शैक्षणिक वर्ष तसेच परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु. १५०/- रक्कमेचा भरणा सदर परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ई-बैंकिंग, क्रेडिट /डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल. (टीप - चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-१

Post a Comment

0 Comments