राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा (सन २०२१ - २०२२)
संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे याकरिता सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये याकरिता नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन मिळावे याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन २०२१-२२ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा (सन २०२१ - २०२२) ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन राज्य शिक्षण व संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे करण्यात येत आहे.
📱खालील 👇 लिंकला स्पर्श करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2020 - 2021 या वर्षाचा निकाल बघा..!!
📱खालील 👇 लिंकला स्पर्श करून नवोपक्रम स्पर्धेकरिता लागणारे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र Download करा..!!
📱खालील 👇 लिंकला स्पर्श करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे | नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे | स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी | स्पर्धेचे नियम | या संपूर्ण बाबी जाणून घेण्याकरिता माहिती पत्रक Download करा..!!
📱खालील 👇 लिंकला स्पर्श करून राज्यस्तरीय नवोपक्रम अहवाल लेखन बाबत मार्गदर्शन कार्यशाळा Video बघा..!!
📱खालील 👇 लिंकला स्पर्श करून नवोपक्रमाचा योग्य तो गट निवडा तसेच नाव नोंदणी करून उपक्रम पाठवा. नवोपक्रम स्पर्धेकरिता खालील गट पाडण्यात आले आहेत..!!
http://innovation.scertmaha.ac.in/पूर्व प्राथमिक गट -
(अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका,पर्यवेक्षिका)
प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट -
(उपशिक्षक,पदवीधरशिक्षक,प्राथमिक मुख्याध्यापक)
माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट -
(माध्यमिक शिक्षक,उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक)
विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गट -
(विषय सहाय्यक,विषय साधन व्यक्ती)
अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट -
(केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी,अधिव्याख्याता,वरिष्ठ अधिव्याख्याता)
0 Comments