Subscribe Us

SQAAF- शाळा प्रकारानुसार किती मानके भरावी? Online माहिती कशी भरावी? Download 128 शाळा मानक Pdf व संपूर्ण प्रक्रिया..!!

SQAAF- शाळा प्रकारानुसार किती मानके भरावी? Online माहिती कशी भरावी? Download 128 शाळा मानक Pdf व संपूर्ण प्रक्रिया..!!


February 18, 2025
    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी राज्यात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत शाळा मूल्यांकनासाठी शाळा सिद्धि ऐवजी आता शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) तयार करण्यात आला आहे. यामध्ये शाळा प्रथम स्वयं मूल्यांकन करणार आहे व त्यानंतर शाळांची बाह्य मूल्यांकन होणार आहे.

शाळेच्या प्रकारानुसार भरावयाची एकूण मानके -
    शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा नोंदणी करिता एकूण 128 मानके आहेत. परंतु सर्व प्रकारच्या शाळांना पूर्ण मानके भरावयाची नसून त्यामधील काही मानके वगळून निश्चित केलेली मानके भरावी लागणार आहे. टर शाळेच्या प्रकारानुसार आपल्याला खालील चार्ट मध्ये दिल्या प्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे.


शाळा नोंदणी लिंक व मानके कशी भरावी संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे-
    राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी आदेश निर्गमित करून तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. शाळांना प्रथम दिलेल्या लिंकवर जाऊन शाळांची नोंदणी करायची आहे.

शाळा नोंदणी लिंक - https://scert-data.web.app/

1) वरील लिंकवर क्लिक केल्यास खालीलप्रमाणे विंडो ओपन होईल.

2) त्यामध्ये प्रथम खाते तयार करा यावर क्लिक करा त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आपल्या शाळेचा अधिकृत ई-मेल आयडी टाका आपल्या सोयीनुसार पासवर्ड दोन्ही ठिकाणी टाईप करा.

3) सदर ई-मेल आयडी हा तुमचा या पोर्टलसाठी यूजर आयडी असेल तर तुम्ही निवडलेला पासवर्ड हा पुन्हा लॉगिन करण्यासाठी आवश्यक असेल.

4) खाते तयार करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदवलेल्या ईमेल आयडीवर खालीलप्रमाणे एक लिंक प्राप्त होईल.


5) प्राप्त झालेल्या लिंकवर क्लिक करून आपला ईमेल आयडी व्हेरिफाय करून घ्यावा. तो वेरीफाय झाल्यानंतर आपल्याला पोर्टलवर लॉगिन करा.

6) शाळा यु-डायस नंबर व शाळा मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकून पुन्हा लॉग इन करा. शाळेचे डिटेल्स तपासून घ्या आणि आपलीच शाळा असल्याची पुष्टी करा.

7) योग्य माहिती नोंदवली असल्यास तुम्हाला तुमच्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल व एकूण 128 मानके तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये दिसून येतील.

8) आपल्या शाळेच्या स्थितीनुसार मानकांमधील स्तर निवडून त्याविषयीचे पुरावे गुगल ड्राईव्ह वर सेव करून त्याची लिंक त्या मानकाखाली पेस्ट करून प्रत्येक मानकाबद्दल आपल्या शाळेची स्थिती नोंदवा. 

SQAAF- शाळा मानक PDF Download - Click Here

    अशाप्रकारे आपण शाळा रजिस्ट्रेशन करून शाळा लॉगइन द्वारे शाळेची संपूर्ण माहिती तपासू शकतो आणि आपल्या शाळेला भारावावाची एकूण मानके क्रमनिहाय भरू शकतो. अधिक माहितीसाठी संपूर्ण 128 मानकांची PDF आपण वर दिलेल्या Click Here या बटनाला स्पर्श करून Download करावी. त्यानुसार आपल्या शाळेची कच्ची माहिती भरून तयार ठेवावी.

Post a Comment

0 Comments