Subscribe Us

शाळेतील विद्यार्थ्यांचा अपार आयडी कसा तयार करावा ? How to Generate APAAR ID ? Step by Step संपूर्ण माहिती..!!

शाळेतील विद्यार्थ्यांचा अपार आयडी कसा तयार करावा ? How to Generate APAAR ID ? Step by Step संपूर्ण माहिती..!!


APAAR ID कसा तयार करावा?

    इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचा अपार आयडी यु-डायस स्टुडन्ट पोर्टलवर तयार करायचा आहे. याबाबत संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप पुढील प्रमाणे -

1) सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या पालकाचे संमतीपत्र भरून पालकांची स्वाक्षरी घ्या.
2) संमती पत्रासोबत पालकांचे ओळखपत्र ADHAR, PAN etc  Zerox जोडा.
3) ओळखपत्राचा प्रकार व क्रमांक संमतीपत्रावर अचूक नोंद करा.
4) खाली सांगितल्याप्रमाणे Step by Step कृती करा.

APAAR ID Create Webside, पालकांचे संमतीपत्र व नमूना फॉर्म, Latest शासन परिपत्रक Download करा. - Click Here

APAAR ID करिता यु-डायस प्लस पोर्टल लिंक Open करा. - Click Here

खालीलप्रमाणे  Step by Step कृती करा..!!

1) सर्वप्रथम वरील लिंकवर क्लिक करून आपल्या शाळेचा यु डायस प्लस पोर्टलचा यूजर आयडी म्हणजेच यु डायस कोड व पासवर्ड टाकून लॉगिन करा. यामध्ये Current Academic Year यावर क्लिक करा.


2) पुढील विंडोमध्ये दिल्याप्रमाणे APAAR Module वर क्लिक करा. आता ज्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करायचे आहे तो वर्ग निवडा तुम्हाला त्या वर्गातील विद्यार्थ्यांची लिस्ट पुढील विंडोमध्ये दिल्याप्रमाणे दिसून येईल.

3) विद्यार्थ्यांच्या नावासमोर शेवटी असलेले Generate यावर क्लिक करा.

4)) खालीलप्रमाणे विंडो ओपन होईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती दिसेल व त्याखाली विद्यार्थ्यांच्या पालकाचे संमती पत्र दिसेल त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकाची विद्यार्थ्यांशी असलेले नाते ड्रॉप डाऊन लिस्ट मधून निवडा. त्या अगोदर विद्यार्थ्यांच्या पालकाची नाव टाईप करा. नाते निवडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या ओळखपत्राचा प्रकार निवडा व त्यानंतर त्या ओळखपत्राचा क्रमांक अचूक नोंदवा. सर्वात शेवटी असलेल्या निळा रंगाच्या Submit या बटनवर क्लिक करा.

5) वरील विंडोमध्ये अचूक माहिती नोंदवून सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांचा अपार आयडी यशस्वीरित्या बनवल्या गेला आहे(APAAR ID generated successfully) असा मेसेज व तयार झालेला अपार आयडी आपल्याला दिसेल.

6) सदर अपार आयडी आपण नोंदवून घ्यायचा आहे. यु-डायस प्लस स्टुडन्ट पोर्टलवर तो आपल्याला नेहमीसाठी उपलब्ध असणार आहे.


Post a Comment

0 Comments