Subscribe Us

शाळापूर्व तयारी अभियान 2022-23 | प्रशिक्षण, मेळावा आयोजन व कार्ड्स | संपूर्ण माहिती व PDF

शाळापूर्व तयारी अभियान 2022-23 | प्रशिक्षण, मेळावा आयोजन व कार्ड्स | संपूर्ण माहिती व PDF


COVID-19 मुळे मार्च 2020 पासून शाळा बंद झाल्या आणि Online शिक्षणाला सुरुवात झाली. याचा फटका मोठ्या प्रमाणत पूर्व प्राथमिक शिक्षणाला बसला. या पार्श्वभूमीवर शाळा पुन्हा नव्याने सुरु झाल्यामुळे जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्च' प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची अंबलबजावणी करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या (STARS) (Strengthening Teaching- Learning and Results for States) प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह एकुण सहा राज्यांची (हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ) Performance Grading Index मधील कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली आहे. 

शाळापूर्व तयारी अभियान- 2022
प्रथम संस्था, MSCERT, समग्र शिक्षा आणि शिक्षण विभाग यांनी एकत्र येऊन मार्च ते जून २०२२ या दरम्यान शाळापूर्व तयारी अभियान राबविण्याचे ठरविले आहे. मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरूवात चांगली झाली तर पुढील शिक्षण प्राप्त करणे त्यांना सहज होऊ शकेल. अनेक अहवालातून आणि अनुभवातून असे आढळले आहे कि मुलं शाळापूर्व तयारी अभावी इयत्ता पहिलीत येतात आणि त्यांना औपचारिक शिक्षण प्राप्त करताना अनेक अडचणी येतात. परिणामतः पुढे वाचन-गणिताच्या पायभूत क्षमता देखील पूर्णपणे विकसित होत नाहीत. अशी मुलं पुढे जाऊन अभ्यासात मागेच पडतात. 

1) इयत्ता १ली-२री मधील मुलांनी नीट अंगणवाडी आणि शाळा सुद्धा अनुभवलेली नाही म्हणून शाळा पुन्हा सुरु होत असताना गावस्तरावर पालक, शिक्षक, अंगणवाडी, तरुण स्वयंसेवक, ग्रामस्थ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी इयत्ता पहिलीत आलेल्या मुलांच्या ‘शाळापूर्व तयारी’साठी राज्यव्यापी मोहिम आखण्यात आली आहे.
2) समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाखाली पूर्व प्राथमिक ते इ. १२वी या वर्गामध्ये दर्जेदार शिक्षण देणे आणि अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणे, शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या पध्दतीत सुधारणा, मूल्यमापन पध्दतीत सुधारणा या बाबींचा समावेश सर्व पातळीवर करुन शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुधारणा करणे हे STARS प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. 
3) इयत्ता ६वी वर्गापासून व्यवसाय शिक्षणाचे Strengthening and Upgradation करणे यांचा अंतर्भाव या योजनेखाली करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
4) जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केले जाणारा “राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching- Learnming And Results for States) STARS हा प्रकल्प राज्यात राबविण्यास शासन मान्यता देत आहे.

(STARS) प्रकल्पाची उद्दिष्टे -
अ) पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण देणे आणि नियमित व गतीशील प्रयत्नाने अध्ययन निष्पत्ती सुधारण्यावर भर देणे.
आ) शिक्षकांचे प्रशिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे, शैक्षणिक प्रशासकीय व्यवस्था पारदर्शक बनविण्यासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करणे.
इ) राज्यातील विद्यार्थ्यांची मूल्यांकन व्यवस्था सुधारणे.
ई) शाळाबाह्य मुले, विशेष गरजा असणारी बालके, मुली आणि वंचीत समुदायातील विद्यार्थी यांच्यावर विशेष लक्ष देणे व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे.

शाळापूर्व तयारी प्रशिक्षण -
सन 2022-23 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत शाळापूर्व तयारी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विभागस्तर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षकाचे तालुकास्तर प्रशिक्षण व शाळापूर्व तयारी मेळावे आयोजन करणेसाठी शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचे केंद्रस्तर प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे.

शाळापूर्व तयारी मेळावा आयोजन -
1. गावस्तरावर सर्वजणांनी मिळून इयत्ता पहिलीत जून २०२२ मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या ‘शाळापूर्व तयारी’साठी मेळाव्याचे मार्च-२२ च्या अंतीम किंवा एप्रिल-२२ च्या पहिल्या आठवडयात आयोजन करावे.
2. या मेळाव्यात (गाव स्तरावर) इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या गावातील सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना विशेषत: मातांना आमंत्रीत करावे.
3. मेळाव्याचा योग्य प्रचार गावात आधीच करावा. यासाठी पोस्टर, दवंडी, प्रभातफेरी, लाउड स्पीकर आणि विविध माध्यमांचा उपयोग करावा. या प्रक्रियेत गावातील तरुण स्वयंसेवकांचे व ग्राम पंचायतचे सहकार्य घ्यावे.
4. या संदर्भात गावातील तरुण स्वयंसेवकांचे अभिमुखीकरण (Orientation) आधीच करावे. मेळाव्यामधील प्रत्येक काउंटरवर कोण स्वयंसेवक बसणार आणि कोणकोणत्या एक्टिविटीज़ घेणार याबद्दल आधीच त्यांच्यासोबत चर्चा करावी.

शाळापूर्व तयारी अभियान मेळावा आयोजनासाठी आवश्यक PDF -
(खालील Click Here बटनाला स्पर्श करून हवी ती PDF Download करा.)

1) शाळापूर्व तयारी प्रशिक्षण बाबत (शासन परिपत्रक) - Click Here

2) शाळापूर्व तयारी (मेळावा आयोजन स्टेप्स) - Click Here

3) शाळापूर्व तयारी (मेळावा BANNER) - Click Here

4) शाळापूर्व तयारी (पोस्टर्स) - Click Here

5) शाळापूर्व तयारी (शाळेतील पहिले पाऊल पुस्तिका) - Click Here

6) शाळापूर्व तयारी (बालकासाठी वर्कशीट) - Click Here

7) शाळापूर्व तयारी (विकासपत्र - मूल्यमापन शीट) - Click Here

8) शाळापूर्व तयारी (पालकांसाठी आयडिया कार्ड) - Click Here

9) शाळापूर्व तयारी (स्वयंसेवक सहभागी प्रमाणपत्र) - Click Here

Post a Comment

0 Comments