Subscribe Us

Student Portal व आधार Update बाबत | संचमान्यता- 2021 | मा. शिक्षणाधिकारी यांचा संदेश

Student Portal व आधार Update बाबत | संचमान्यता- 2021 | मा. शिक्षणाधिकारी यांचा संदेश


आधार नोंदणी व संचमान्यता बाबत महत्त्वापूर्ण सूचना :-

1. राज्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची नोंद त्यांच्या आधार क्रमांकासह सरल प्रणालीमध्ये करणे बंधनकारक आहे. या संदर्भात आपल्याला यापूर्वी सुध्दा वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहे. विद्यार्थी नोंदीच्या आधारावरच संचमान्यता करण्यात येणार आहे. याची सुध्दा आपल्याला जाणीव आहे.

2. सर्व विद्यार्थ्यांची आधारसह नोंद न झाल्यास आपल्या शाळेतील काही शिक्षक अतिरिक्त होण्याचीही शक्यता आहे. तरीसुध्दा अजून आपल्यामार्फत १००% मुलाची अचूक आधार नोंदणी करण्यात आली नाही असे लक्षात आले आहे.

3. सरल प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या आणि प्रत्यक्ष आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे दिलेल्या आकडेवारीवरुन दिसून येते. या बाबतचा तपशील पुढील तक्त्यात दर्शविता आहे.
(याठिकाणी प्रत्येक शाळेचा आधार तपशील तक्ता दिलेला असेल)

4. शाळा लॉगीनमध्ये विद्यार्थीनिहाय माहिती उपलब्ध करून दिली आहे. असेही लक्षात आले आहे की, काही विद्यार्थ्यांच्या कोणतीही नोंद अभिलेखाशी जुळत (Match) नाही, ही फार गंभीर बाब आहे. सदर डेटा शासनामार्फत UIDAI (आधार) डेटा बेसशी मॅच करण्यात येईल व अवैधआधार दिसल्यास किंवा एकाच विद्यार्थ्यांची २ ठिकाणी नोंदणी केल्याचे आढळल्यास हा गुन्हा समजला जाईत याची नोंद घ्यावी. 

Student Portal वर आधार Update बाबत खालील कार्यवाही करावी :-

1. ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सरल प्रणालीमध्ये केली आहे. मात्र आधार व सरल प्रणालीतील नोंदींमध्ये (Entries) तफावत आहे. (उदा: नावात, जन्म तारिख, लिंग) त्याची त्वरीत तपासणी करुन १००% चुका दुरुस्त करुन घेण्यात याव्यात.

2. तसेच ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सरल प्रणातीत अजूनही केलेली नाही त्यांची आधार क्रमांकाची नोंद सरल प्रणातीत त्वरीत अद्ययावत करावी. 

3. आपल्याला Student Portal मध्ये विद्यार्थ्यांचे आधार Update करण्याविषयी ही शेवटची संधी म्हणून नोटिस देण्यात येत आहे.  

4. ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नाही किंवा चुकीची नोंद आहे, दुबार नोंद आहे किंवा अवैध आधार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना पटसंख्येत ग्राहय धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

5. प्रत्येक शाळेने Student Portal मध्ये विद्यार्थ्यांच्या आधारबाबत आपल्या स्तरावरून अचूक नोंदी करून अवैध विद्यार्थी संख्या पटावरुन कमी करावी.

Post a Comment

1 Comments